बातम्या

२६ जानेवारी २०२४ हा भारतीयांसाठी महत्त्वाचा क्षण

26 January 2024 is an important moment for Indians


By nisha patil - 1/26/2024 7:29:51 AM
Share This News:



२६ जानेवारी २०२४ हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण असणार आहे. यंदा कोट्यावधी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा हिरक महोत्सवी सोहळा साजरा करणार आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान समितीने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले गेले. म्हणूनच २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. याच दिवशी तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्यासाठी घोषणा सुद्धा केली होती. भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक असेलेल्या या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे


२६ जानेवारी २०२४ हा भारतीयांसाठी महत्त्वाचा क्षण