बातम्या

नूतन बॅंकेत ३ कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार उघड

3 crore 58 lakh 37 thousand rupees embezzlement revealed in Nutan Bank


By nisha patil - 8/17/2023 11:23:15 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेमध्ये संचालक मंडळाची मंजुरी न घेता नियमबाह्य कर्जाचे वाटप , थकबाकी असतानाही कर्ज देऊन आर्थिक हानी करत बँकेची सुमारे ३ कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमनसह 19 जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील 14 जणांना पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली. तर उर्वरित पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबतची तक्रार  धोंडीराम आकाराम चौगुले ( रा. राजारामपुरी , कोल्हापूर ) यांनी दिली आहे.
              बॅंकेचे चेअरमन प्रकाश शंकरराव पुजारी ,सिनियर मॅनेजर रावसाहेब महादेव जावळे (रा. राजेंद्रनगर कोल्हापूर), शाखाधिकारी
मलकारी लवटे (रा . शेळके गल्ली , इचलकरंजी)
 राजेंद्र जयपाल मौर्य (रा. सांगली नाका), पासिंग ऑफिसर सुरेखा जयपाल बडबडे (रा. बिग बाजारजवळ), ज्युनिअर ऑफिसर मारुती कोंडीबा अनुसे (रा. माले मुडशिंगी), शिपाई अभिजित मल्हारी सोलगे (रा. माणगांवकर बोळ), कॅशियर वैभव बाळगोंडा गवळी (रा. बरगे मळा), क्लार्क निलेश शिवाजी दळवी (रा. लिगाडे मळा), कॅशियर रोहित बळवंत कवठेकर (रा. निंबळक ता. तासगांव), क्लार्क सर्जेराव महादेव जगताप (रा. येडेमच्छिंद्र जि. सांगली), आयटी मॅनेजर शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी),  शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम (रा. पलूस ता. सांगली), शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील (रा. जयसिंगपूर), शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे (रा. राजाराम ता. तासगांव), क्लार्क सारीका निलेश कडतारे (रा. सरनोबतवाडी), शिपाई विजय परशराम माळी (रा. ढोरवेत तालीम) यांचा समावेश आहे. अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
              पोलिसातून मिळालेली माहिती अशी , तक्रारदार धोंडीराम चौगुले हे चार्टर्ड अकाउंटंट असून भारतीय रिझर्व बँक आणि शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचे प्रशासक यांच्या पत्रानुसार बँकेचे सन 2020 - 21 व  2021 - 22 सालचे लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील संशयतांनी कर्जाची येणे बाकी असताना कपटाने किंवा अप्रामाणिकपणे बनावट निरंक दाखले देणे व ते खरे म्हणून वापरणे. कर्जाची बाकी असताना बेकायदेशीर उचल देणे , कर्जाला बेकायदेशीर सूट देणे , बँक स्टाफला व्हौचरवर कोणत्या कामासाठी ऍडव्हान्स दिला याचा उल्लेख न करता बेकायदेशीर बनावट व व्हौचर देणे. नातेवाईकांना कर्ज देता येत नसल्याचा नियम डावलून कर्ज देणे , बाकी असताना चेअरमन व त्यांच्या पत्नी यांना नियमबाह्य कर्ज देणे. कर्जाचे दस्तऐवज न ठेवता व संचालक मंडळांची मंजुरी न घेता कर्ज वाटप करणे. ठेवीदारांना ठेवीच्या बदल्यात कबूल विनीतिष्ठ सेवा देताना कसूर करत बँकेची गैरहणी करण्याच्या हेतूने पदाचा दूर उपयोग केला. सन 2020 - 21 मध्ये एक कोटी 50 लाख 37 हजार रुपये तर सन 2021 - 22 मध्ये 2 कोटी 7 लाख 98 हजार असा एकूण 3 कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार व गैरव्यवहार संगनमताने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान , हा अपहार इचलकरंजी येथील बँक , पलूस व इस्लामपूर शाखेत झाला आहे. याप्रकरणी चेअरमनसह 14 जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली. तर उर्वरित सुरेखा बडबडे , सर्जेराव जगताप , राहुल पाटील , सारिका कडतरे व कांचन पुजारी यांचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत.


नूतन बॅंकेत ३ कोटी 58 लाख 37 हजार रुपयांचा अपहार उघड