बातम्या

सरकारमधील ३ पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र आजारी - राज ठाकरे

3 parties in the government left Maharashtra sick  Raj Thackeray


By nisha patil - 3/10/2023 4:00:41 PM
Share This News:



नांदेड येथील डॉ. शंकराव चव्हाण  रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामुळे राज्यभर  एकच खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये  बारा नवजात बालकांचा समावेश असून, तब्बल सत्तर रुग्णांची मृत्यूची झुंज सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

 नांदेड घटनेवरून विविध राजकीय नेत्यांनी सरकारवर चांगलाच  निशाणा साधलाय. त्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही त्यांच्या सोशल मीडिया वरून राज्य सरकारचा  समाचार घेतला. नांदेड मधल्या सरकारी रुग्णालयात गेला 24 तासात 24 मृत्यू झाले ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात ही अशीच घटना घडली होती. राज्यातल्या सरकारी रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे औषधे पुरवून वापरा असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि या घटना फक्त नांदेड,  ठाणे आणि मुंबईतच  मर्यादित नाही, तर सर्वत्र आहेत.  
   तीन-तीन इंजन लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटर वर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण यात महाराष्ट्राचं काय? दुर्दैव असे की सरकार मधले तिन्ही पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी . सरकारने स्वतःचे आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचा आरोग्य कसे सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावे असे म्हणत राज ठाकरे यांनी शिंदे फडवणीस आणि पवार यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं.


सरकारमधील ३ पक्ष ठणठणीत बाकी महाराष्ट्र आजारी - राज ठाकरे