बातम्या
आई-वडिल्यांच्या डोळ्यांदेखतच 3 वर्षांच्या जुळ्या मुलींचा अंत
By nisha patil - 10/17/2023 7:14:35 PM
Share This News:
पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पुण्यात झालेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला आहे. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची धडक बसून झालेल्या अपघातात दोन जुळ्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला यात त्यांचे आई-वडिल गंभीर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कुमार झा हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली. श्रद्धा आणि साक्षी अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावं आहेत.
या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताच्या व्हिडिओंमध्ये ट्रॅकर चालकालाची चूक असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरु केली. चारही जणांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी गडबड सुरु होती. मात्र तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी पेट्रोल टँकर चालकाला अटक केली आहे
आई-वडिल्यांच्या डोळ्यांदेखतच 3 वर्षांच्या जुळ्या मुलींचा अंत
|