बातम्या

श्रीपतराव चौगुले कॉलेज मार्फत शरद शिंदे ला ३० हजार ची मदत

30 000 help to Sharad Shinde through Shripatrao Chaugule College


By nisha patil - 4/30/2024 5:26:57 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील माजी विद्यार्थी शरद शहाजी शिंदे मु.पो.दिगवडे याच्या किडनी प्रत्यारोपणासाठी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ व महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी परिवारामार्फत रुपये ३००००/- (तीस हजार ) ची मदत शरदच्या आई-वडीलाच्याकडे सौ.वेदांतिका धैर्यशील माने यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,संस्था संचालक डॉ.अजय चौगुले.प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,बबन चौगुले व मान्यवर उपस्थित होते.
 


श्रीपतराव चौगुले कॉलेज मार्फत शरद शिंदे ला ३० हजार ची मदत