बातम्या

दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ३०० स्पर्धकांचा सहभाग...

300 contestants participated in district level sports competition for disabled children


By nisha patil - 1/29/2024 6:24:32 PM
Share This News:



दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ३०० स्पर्धकांचा सहभाग...
   
कोल्हापूर - समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद आणि रोटरी क्लब ऑफ होरायझन यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष शाळा आणि  कर्मशाळामधील दिव्यांग मुलांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पोलिस कवायत मैदानावर उत्साहात पार पडली.  यावेळी  रोटरी क्लब ऑफ होरायझनचे  अध्यक्ष ॲड.अभयसिंह बिचकर, झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष नरेंद्र झंवर, ॲड. संदीप पवार, सागर बकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलय. 

या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २२ शाळांमधील कर्णबधिर, मतिमंद, अंध प्रवर्गातील ३०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी लांब उडी, गोळा फेक, धावणे, स्पॉटबॉल थ्रो, स्पॉट जम्प, बुध्दिबळ, पासिंग बॉल अशा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.


दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ३०० स्पर्धकांचा सहभाग...