बातम्या

राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन

35 lakh tonnes of sugar production in the state


By nisha patil - 2/1/2024 12:58:16 PM
Share This News:



राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन

राज्यातील ऊसगाळप हंगामाने जोर पकडला असून, सद्य:स्थितीत 35 लाख टन साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. साखर कारखान्यांनी 402 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले असून, सरासरी साखर उतारा 8.84 टक्क्यांइतका हाती आला आहे.राज्यात सद्य:स्थितीत 9 लाख 8 हजार 600 टन याप्रमाणे उसाचे रोजचे गाळप होत असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.

राज्यात 96 सहकारी आणि 99 खासगी मिळून 195 साखर कारखान्यांकडून ऊसगाळप सुरू आहे. गतवर्षीच्या ऊसगाळप हंगामात 28 डिसेंबरअखेर 102 सहकारी आणि 99 खासगी मिळून 201 साखर कारखान्यांनी 478 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले आहे, तर 9.32 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 44 लाख 65 हजार टनाइतके साखर उत्पादन तयार केले होते. याचा विचार करता अद्यापही 76 लाख टनांनी ऊसगाळप कमीच झाले आहे. ऊस गाळपात पुणे विभागाची (पुणे व सातारा जिल्हा) आघाडी कायम आहे.

येथील 29 कारखान्यांनी 92 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले असून, 9.09 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 83.68 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. दरम्यान, सोलापूर विभागात 87.06 लाख टन ऊसगाळप, तर 8.12 टक्के उतार्‍यानुसार 70.71 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. विभागनिहाय ऊसगाळप पाहता अहमदनगरमध्ये 51.66 लाख टन, औरंगाबाद 38.02, नांदेड 45.59, अमरावती 3.48, नागपूरमध्ये 0.83 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण केले.


राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन