बातम्या

शाहूपुरी पोलिसांकडून ३,५५,५००/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागळेने जप्त कोल्हापूर :

355500 gold bars seized by Shahupuri police


By nisha patil - 1/24/2024 7:53:34 PM
Share This News:



शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हयातील फिर्यादी पृथ्वीराज धैर्यशील पाटील  कोल्हापूर यांचे सोन्याचे दागिने त्यांचे राहते घरी काम करणारा रोहित महेश सावंत व त्यांचे मित्र रोहन कांबळे , जस्सी चांदणे यांनी चोरी केलेचा संशय घेऊन वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सदर गुन्हयातील आरोपी १)रोहित महेश सावंत २)रोहन अरुण कांबळ ३) जस्सी सुधीर चांदणे  यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपी यांचे कडून चोरीस गेलेले ३,५५,५००/- किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. सदर चोरी हि त्यांनी लोकांची देणी भागविनेसाठी केली. आरोपी हे गाड्या सर्व्हिसिंग चे काम करतात.


 याकरिता  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित  पोलीस निरीक्षक, अजय सिंदकर यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलीस
अंमलदार मिलिंद बांगर, महेश पाटील, विकास चौगुले, बाबा ढाकणे,रवि आंबेकर, लखन पाटील ,
शुभम संकपाळ यांनी केली आहे.


शाहूपुरी पोलिसांकडून ३,५५,५००/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागळेने जप्त कोल्हापूर :