बातम्या
३७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३-२०२४ सहभागी शिवाजी विद्यापीठ संघास २ सुवर्णपदके व ३ रौप्यपदक प्राप्त
By nisha patil - 5/4/2024 6:20:42 PM
Share This News:
३७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३-२०२४ पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना (पंजाब) येथे दि. २८ मार्च ते दि. १ एप्रिल, २०२४ या कालावधीत आयोजित करणेत आलेला होता. सदर युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण २९ सदस्यांचा संघ सहभागी होवून खालील स्पर्धेत क्रमांक प्राप्त झालेले आहेत.
१. पोस्टर मेकिंग - प्रथम क्रमांक (सहभागी विद्यार्थी – १)
२. व्यंगचित्र - प्रथम क्रमांक (सहभागी विद्यार्थी – १)
३. रॅली - द्वितील क्रमांक (सहभागी संघ – २९)
४. पश्चिमात्य समुहगीत - द्वितील क्रमांक (सहभागी विद्यार्थी – ६)
५. एकांकिका - द्वितील क्रमांक (सहभागी विद्यार्थी – ९)
वरील स्पर्धेत सहभागी एकूण ०२ विद्यार्थांना सुवर्णपदक तसेच १५ विद्यार्थांना रौप्यपदक प्राप्त झाले. सदर युवा महोत्सवामध्ये संपूर्ण देशभरातील १३८ विद्यापीठांनी सहभाग घेतलेला होता.
सदर राष्ट्रीय युवा महोत्सव विद्यापीठ संघास मा. कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सदर संघासोबत लुधियाना पंजाब येथे डॉ. पी. टी. गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास विभाग हे उपस्थित होते. तसेच शिवाजी विद्यापीठ संघासाठी संघव्यवस्थापक म्हणून डॉ. श्रीमती संगीता पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस व डॉ. लक्ष्मीकांत वेळेकर , मुधोजी कॉलेज फलटण व श्री विजय इंगवले, वरिष्ठ सहायक, विद्यार्थी विकास विभाग हे उपस्थित होते.
३७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३-२०२४ सहभागी शिवाजी विद्यापीठ संघास २ सुवर्णपदके व ३ रौप्यपदक प्राप्त
|