बातम्या
‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज
By nisha patil - 3/21/2024 7:46:11 AM
Share This News:
शरीरात मुबलक प्रमाणात पाणी असणे गरजेचे असते. आजारी पडल्यानंतर जास्तीत-जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पिणे आवश्यक असते. पाणी शरीराला योग्य प्रमाणात मिळाले तर शरीर विषारी घटक बाहेर टाकू शकते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळत नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरातील तरलता वाढवण्यासाठी योग शास्त्रामध्ये एक मुद्रा असून या मुद्रेला वरूण मुद्रा असे म्हणतात.
अशी करा मुद्रा
डाव्या हाताची करंगळी म्हणजेच कनिष्ठा ही जल तत्त्वाची प्रतिक मानली जाते. जल तत्त्व व अग्नी तत्त्वाच्या संयोगातून परिवर्तन घडते. करंगळीचा अग्रभाग आणि अगंठ्याचा अग्रभाग मिळविल्याने वरूण मुद्रा तयार होते. हिवाळ्यात वरूण मुद्रा जास्त वेळ करू नये. अन्य ऋतुमध्ये कमीत-कमी चोविस मिनिटे करावी. जास्तीत-जास्त अठ्ठेचाळीस मिनिटे करता येते.
हे फायदे होतात
१) त्वचा नितळ होते.
२) शरीरातील पाण्याची मात्रा संतुलीत राहते.
३) त्वचारोग बरे होतात.
४) रक्त शुध्द होते.
‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज
|