बातम्या

आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांतून ४ रुग्णाना ‘मुख्यमंत्री सहाय्यता’मधून पावणे तीन लाखांची मदत

4 patients through the efforts of MLA Rituraj Patil Three lakhs to be received from


By nisha patil - 9/23/2023 1:07:54 AM
Share This News:



कोल्हापूर/   कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे  आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून २ लहान बाळासह चार रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख सत्तर हजर रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या चारही रुग्णांच्या नातेवाईकाना अर्थसहाय्य मंजुरीची पत्रे दिली.

   करवीर तालुक्यातील चिंचवाड येथील रोहिणी अमित सुतार व दुर्गमानवाड (राधानगरी) येथील सोनाली वैभव गुरव यांच्या लहान बाळांवर रुग्णालयात हलविण्यात उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजताच आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालयाकडून  सुतार यांनी ७० हजार रुपये तर गुरव यांना ५० हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्याचबरोबर साने गुरुजी वसाहत येथील मीनाक्षी बसवाणी सुतार यांना  १ लाख रुपये तर फुलेवाडी येथील किरण रंगराव चव्हाण यांना गुडघा उपचारासाठी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. 

  आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजुरीची पत्र रुग्णाच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केली. आमदार पाटील यांनी यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेऊन ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.


आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांतून ४ रुग्णाना ‘मुख्यमंत्री सहाय्यता’मधून पावणे तीन लाखांची मदत