बातम्या
कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क परिपत्रकाची बी आर एस पक्षातर्फे होळी
By nisha patil - 8/21/2023 4:52:17 AM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी केंद्र सरकारने शनिवारी अधिसूचना काढून कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर बी आर एस पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली व यावेळी केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी बी आर एस पक्ष नेते संजय पाटील म्हणाले ,आतापर्यंत कांद्याच्या निर्यातीवर कर आकारला जात नव्हता पण केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहेg शेतकऱ्याला केंद्राच्या निर्णयामुळे चांगल्या भावाला मुकावे लागणार आहेg त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना रडवणार आहे .मध्यमवर्गीय ग्राहकांचे हित जपताना केंद्राला शेतकऱ्यांचा विसर पडला असून शेतकरी हित विरोधी अधिसूचना केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावी. अन्यथा राज्यभर केंद्र सरकार विरोधात उग्र आंदोलन करण्यात येईल. केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असून कोरोनातून नुकत्याच सावरलेल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळणार होते पण ते सुद्धा केंद्राने हिरावून घेतले .गेल्या सहा महिन्यापासून कांदा साठवून ठेवणारे शेतकरी हवालदिल झालेले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांची वाट लागून शेतकरी उध्वस्त होणार आहे असा उध्वस्त करणारा निर्णय तातडीने मागे घ्या या आंदोलनात बी आर एस नेते संजय पाटील ,जिल्हा समन्वयक तोहीद बक्षु, संग्राम जाधव ,विक्रम जरग, भीमराव पाटील, बाबुराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य ,सतीश मोटे, प्रकाश पाटील ,तानाजी मोरे, रोहित जाधव ,संदीप वाडकर व पदाधिकारी सामील झाले होते.
कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क परिपत्रकाची बी आर एस पक्षातर्फे होळी
|