बातम्या
डी वाय पी अभियांत्रिकी सिविलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती
By nisha patil - 8/1/2024 7:43:15 AM
Share This News:
डी वाय पी अभियांत्रिकी सिविलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती
डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या तीन विद्यार्थ्यांना इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूट या जगातील नामांकित संस्थेकडून संशोधनासाठी 45 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
या शिष्यवृत्तीमुळे मुलांना काँक्रीट वरील संशोधनासाठी विशेष मदत होणार आहे. या संशोधनातून काँक्रीट विषयामध्ये शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे.
संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्याकडून शिष्वृत्तीधारक विद्यार्थी स्नेहल निकम, सानिका शिंदे, तेजस माने व विभाग प्रमुख डॉ. किरण माने यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी इंडियन चॅप्टर ऑफ अमेरिकन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय समन्वयीका प्राध्यापक वर्षा डोईजड उपस्थित होत्या.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन लाभले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कसबा बावडा: शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना डॉ. ए.के. गुप्ता. समवेत डॉ. संतोष चेडे डॉक्टर किरण माने आदी.
डी वाय पी अभियांत्रिकी सिविलच्या विद्यार्थ्यांना 45 हजारांची शिष्यवृत्ती
|