बातम्या

शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेतील पंधरा विजेत्यांचा शहाजी महाविद्यालयात सत्कार

469 cases settled  Adalat 10 crore recovered


By nisha patil - 11/9/2023 5:56:38 PM
Share This News:



कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेतील विविध विभागात पारितोषिके मिळवली. या विद्यार्थ्यांचा आज (सोमवारी)  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण यांनी सत्कार केला.
   

यावेळी युगांतर नियतकालिकाचे संपादक प्रा. डॉ.सरोज पाटील, प्रा. डॉ.राज बिरंजे  प्रबंधक मनीष भोसले, ग्रंथपाल डॉ पांडुरंग पाटील उपस्थित होते. 
   

महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी विविध लेखन प्रकारामध्ये समीक्षा, एकांकिका ,व्यक्तीचित्र, मुलाखत, प्रवास वर्णन, वैचारिक लेखन, संशोधन लेखन, आत्मकथन पर लेखन प्रकारात दर्जेदार लेखन करून विविध पारितोषिक मिळाली. ही पारितोषिके आणि रोख रक्कम विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना दिली या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना मध्ये स्नेहल अविनाश कदम,योगिता मस्कर, पायल प्रमोद कांबळे, प्रतीक्षा अंकुश यमगरणीकर, संजना पाटील, वैष्णवी हिंदुराव चेचर, सुरेखा वसंत पाटील, निकिता रामचंद्र नलावडे, चाहत मुन्सी धनश्री देवणे,ऋतुजा पाटील, वर्षा देवणे कृष्णा पटेल, वेलांतली पाटील या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.


शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेतील पंधरा विजेत्यांचा शहाजी महाविद्यालयात सत्कार