बातम्या

लोकअदालतीत ४६९ प्रकरणे निकाली ; १० कोटी वसुली

469 cases settled in Lok Adalat 10 crore recovered


By nisha patil - 11/9/2023 9:58:22 AM
Share This News:



लोकअदालतीत ४६९ प्रकरणे निकाली ; १० कोटी वसुली

इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी येथे आज हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.आर. नेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत झाली. यामध्ये दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी  ४६९ प्रकरणे निकालात काढून १० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.

या लोकअदालतीमध्ये  ग्रामपंचायत, महावितरण आणि बँकांची दाखलपूर्व ३ हजार ३८२ आणि न्यायालयातील प्रलंबित २ हजार ७१९ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यातील दाखलपूर्वप्रकरणातील २१९, न्यायालयातील प्रलंबित २५० अशी एकूण ४६९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीसाठी ६ पॅनेल ठेवले होते. जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेरलेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एच.ए. वाणी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.ए. इंगळे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम.एम. चौधरी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.डी. वानखेडे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.एस. पेडणेकर यांनी पॅनेल प्रमुख म्हणून तर न्यायालयातील पॅनेल सदस्य म्हणून विधीज्ञ राजेश घोरपडे, निता परीट, राहुल काटकर, सुनिल देसाई, सोनल कदम, दत्तात्रय कांबळे यांनी काम पाहिले. लोकअदालत यशस्वीतेसाठी इचलकरंजी न्यायालयातील पॅनेलवर नेमलेले न्यायाधीश, इचलकरंजी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे तसेच सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकारांचे सहकार्य लाभले.


लोकअदालतीत ४६९ प्रकरणे निकाली ; १० कोटी वसुली