बातम्या

राज्यात 47 टक्के पेरण्या पूर्ण

47 percent sowing is complete in the state


By nisha patil - 7/13/2023 7:33:33 PM
Share This News:



 तारा न्यूज वेब टीम :राज्यात पावसाचे आगमन होताच, पेरणीला वेग आला. कापूस, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या लागवडीवरच शेतक-यांचा भर आहे. पाऊस लांबल्याने मूग व उडदाऐवजी शेतकरी तुरीकडे वळाले आहेत.राज्यात सोमवार पर्यंत 66.78 लाख हेक्टर (47 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने जूनमध्ये दडी मारली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. अनेक ठिकाणी पेरण्यांसाठी पुरेशा पावसाची आवश्यकता आहे. तरीदेखील शेतकरीवर्ग पेरणीकडे वळला.आहे


राज्यात 47 टक्के पेरण्या पूर्ण