बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
By nisha patil - 2/14/2025 12:05:34 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
कोल्हापूर, 14 फेब्रुवारी: विवेकानंद महाविद्यालयातील वाड्.मय मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी 2025 रोजी चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन शिक्षणतज्ञ व लेखक प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या हस्ते होणार असून, यामध्ये प्रसिद्ध लेखक श्री. नवनाथ गोरे यांची मुलाखत आणि युवा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि साहित्य संमेलनाचे समन्वयक डॉ. एकनाथ आळवेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना या संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
विवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
|