बातम्या

हिवाळ्यात तीळगूळ खाण्याचे 5 फायदे

5 benefits of eating tilgal in winter


By nisha patil - 9/1/2024 7:39:12 AM
Share This News:



मकरसंक्रातीला प्रत्येकाच्या घरी तीळगूळ बनवला जातो. तीळगूळाचा स्वाद खुप छान असतो. तीळगूळ हा आरोग्यासाठी खुप चांगला असतो. तीळगूळाचे दैनंदिन जीवनात खुप महत्त्व आहे. तीळ आणि गूळ यांनी पाचनक्रिया सुरळीत राहते व रोगप्रतिकात्मक शक्ति देखील वाढते. चला जाणून घेऊया तीळगूळ खाण्याचे पाच फायदे

१. तीळगूळ हा पोटासाठी खुप गुणकारी असतो. हा कब्ज, एसीडिटी, गॅसेसची समस्या यापासून सुटका मिळवण्यास मदत करतो आणि पोटा संबंधित समस्या दूर करतो. तसेच पोट साफ करण्यासाठी तीळगूळ हा खुप मदतगार असतो.
 
२. तीळगूळ हा थंडीत सेवन केल्याने सर्दी पासून होणाऱ्या दुष्परिणाम पासून बचाव होतो. हिवाळ्यात तीळगूळाचे सेवन केल्याने शरीर गरम राहण्यास मदत होते. तसेच भूक वाढीसाठी तीळगूळ हा खुप उपयोगी असतो.

 ३. महिलांना मासिक पाळी मध्ये दुखणे कमी होण्यासाठी देखील तीळगूळ हा लाभकारी असतो. तसेच मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होते.

 ४. तीळगूळ हा पाचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतो. तसेच तीळगूळ सोबत सूखा मेवा आणि तुपाचे सेवन केल्याने केस आणि त्वचा संबंधित समस्या पण दूर होतात. 
 
५. तणाव कमी करण्यासाठी तीळगूळ हा उपयोगी असतो. तसेच मानसिक दुर्बलताला कमी करण्यासाठी मदत होते. म्हणून हिवाळ्यात तीळगूळ खाण्याचे खूप फायदे सांगितले आहे.


हिवाळ्यात तीळगूळ खाण्याचे 5 फायदे