बातम्या
5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!
By nisha patil - 9/12/2023 7:16:09 AM
Share This News:
अनेकदा स्कीन रूटीन फॉलो करतात, पण काही छोट्या-छोट्या चुकांमुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू लागतो. रोज कोणत्या चुका केल्याने त्वचा खराब होत आहे, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. चमकदार आणि आकर्षक त्वचा मिळविण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊया.
एक्सफोलेट
त्वचेला एक्सफोलिएशनची विशेष गरज असते. पण ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या. जास्त प्रमाणात एक्सफोलिएशन केल्याने त्वचेचे बॅरियर खराब होऊ शकतो.
अनहेल्दी फूड
अनहेल्दी फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचा त्वचेवर स्पष्ट परिणाम दिसतो. जास्त साखर, प्रोसेस्ड फूड आणि अनहेल्दी फूडमुळे त्वचेवर सूज येते आणि पिंपल्स दिसतात.झोप
नेहमी पुरेशी झोप घ्या. अपुऱ्या झोपेमुळे त्वचेची रंगत कमी होऊ लागते. झोपेत त्वचेच्या दुरुस्तीची प्रक्रिया योग्य प्रकारे होते. त्यामुळे चेहऱ्यावर फाईन लाइन दिसत नाहीत.
सनस्क्रीन लावा
मेक-अप करून कडक उन्हात गेल्यावर धुळीमुळे त्वचा खराब होते. यासाठी सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे हानिकारक यूव्ही किरणांपासून संरक्षण होते.
मेकअप
मेकअप न काढता झोपल्यास त्वचेची हानी होते. त्वचेची छिद्रे बंद होतात आणि पिंपल्स येतात.
त्वचेला ऑक्सिजन आणि हायड्रेशन मिळत नाही.
5 मोठ्या चूका, ज्यामुळे उडते चेहऱ्याची रंगत!
|