बातम्या

बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री

5 lakh aid to the relatives of those killed in the bus accident Chief Minister


By nisha patil - 1/7/2023 4:48:39 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : बुलढाणा इथं झालेल्या बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या  घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी शोक व्यक्त केलाय.  मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय.  तर यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच केंद्र सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलीय.


बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री