बातम्या
फेस सीरम लावताना करता या 5 चुका ?
By nisha patil - 1/24/2024 7:37:42 AM
Share This News:
स्वच्छ, मऊ, निरोगी, चमकदार आणि तरुण त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी महिला अनेक प्रकारचे उपाय करून बघतात. त्वचेची काळजी घेणारी बरीच उत्पादने वापरतात.
चेहरा निरोगी ठेवण्यासाठी सिरम देखील खूप फायदेशीर असते. त्यासाठी लोकं फेस सीरमदेखील वापरतात, परंतु ते योग्यरित्या न लावल्याने त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. फेस सीरम लावण्याचा एक योग्य मार्ग असतो. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर सीरम वापरण्यापूर्वी त्याचे काही तोटे जाणून घ्या.
फेस सीरम चुकीच्या पद्धतीने लावल्याने होऊ शकते हे नुकसान
1. जर तुम्ही सीरम वापरत असाल आणि तुम्हाला त्याचा त्वचेवर कोणताही सकारात्मक परिणाम दिसत नसेल, तर नक्कीच तुम्ही ते वापरताना काही चुका करत असाल. चेहरा न धुता सीरम लावल्यास काही फायदा होणार नाही. त्वचेच्या छिद्रांमध्ये लपलेली घाण सीरमला त्वचेच्या आतील थरांमध्ये जाण्यापासून रोखते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला फायदे मिळवायचे असतील, तर सीरम लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा.
2. तुमच्या तळहातावर सीरम घ्या आणि त्वचेवर लावा. काही लोक ड्रॉपरने त्वचेवर सीरम लावतात, त्यामुळे चेहऱ्यावरील घाण ड्रॉपरवर जाते आणि ती बाटलीत जाते. मग ते सीरम लावल्याने त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते.
3. जर तुम्हाला असे वाटत असेल की एकाच वेळी जास्त सीरम वापरल्याने त्वचेला अधिक फायदे मिळतील, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. जास्त प्रमाणात सीरम लावल्याने त्वचा तेलकट होऊ शकते. 3-4 थेंबांपेक्षा जास्त सीरम लावू नका. ते हातावर घेऊन चेहऱ्यावर लावा आणि बोटांनी गोलाकार मसाज करत त्वचेत ते जिरवा. तेलकट त्वचेमुळे पिंपल्स, आणि मुरुमं वाढतात.
4. चेहऱ्यावर सीरम कधीही जोरात घासून लावू नका. हलक्या हाताने ते संपूर्ण चेहऱ्यावर पसरवा. काही दिवसात तुम्हाला योग्य परिणाम दिसेल.
5. अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे काही महिला स्किन केअर प्रोडक्ट्सची चुकीची निवड करतात. सीरम घेताना हीच चूक केली तर फायदा होणार नाही. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार सर्व प्रकारची उत्पादने खरेदी करून लावावीत. तेलकट आणि कोरड्या सर्व प्रकारच्या त्वचेसाठी तुम्हाला सीरम मिळेल. कोरड्या त्वचेसाठी, ऑईल बेस्ड सीरम घ्या. अधिक आणि योग्य माहितीसाठी स्किन एक्स्पर्टची मदत घ्या आणि मगच ब्युटी प्रॉडक्ट्स निवडा.
फेस सीरम लावताना करता या 5 चुका ?
|