बातम्या
कोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी द्यावा : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी
By nisha patil - 7/1/2025 7:43:48 PM
Share This News:
कोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी द्यावा : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी
कोल्हापूर दिनांक 6 कोल्हापूर शहराला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, पन्हाळा अशा ठिकाणी भाविक व पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. असे असताना शहरातील रस्त्यांची दुरावस्था अद्यापही बिकट आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य असून अनेकांना मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. अनेक वर्षे प्रशासक असल्यामुळे बरीच कामे प्रलंबित राहिले आहेत. शहराच्या या प्रश्नांसंदर्भात आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपा शिष्टमंडळाने भेटून सविस्तर निवेदन सादर केले.
शहर परिसरात प्रत्येक प्रभागात रस्ते, ड्रेनेज, गटर्स, गार्डन सांस्कृतिक हॉल अशा विकास कामांची आवश्यकता असून महापालिकेच्या 81 प्रभागासाठी प्रत्येकी 50 लाख असा एकूण 40 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मुख्यमंत्री म्हणून आपण करावी अशी प्रमुख मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नाही असे शिष्टमंडळाला आश्वस्थ केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव प्र. का. सदस्य राहुल चिकोडे उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी द्यावा : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी
|