बातम्या

तांडा वस्ती योजनेअंतर्गत राधानगरी व आजरा तालुक्यातील विकास कामांना 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – प्रकाश आबिटकर

50 lakh voters approved Radhanagari and todays entire development works under Tanda Vasti 1


By nisha patil - 7/3/2024 10:23:28 PM
Share This News:



गारगोटी प्रतिनिधी, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी 1 कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती, जमाती असून अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत. राधानगरी व आजरा तालुक्यांत अनेक धनगरवस्त्या व इतर वस्त्या असून, या वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून हे लोक वास्तव्य करीत आहेत. बहुसंख्य वस्त्या या डोंगर कपारीत स्थायिक झालेल्या आहेत. या प्रवर्गातील समाज ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्याच ठिकाणी या समाजाला स्थिर जीवन जगता यावे याकरिता त्यांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने तब्बल 15 वस्त्यांसाठी विविध विकास कामांसाठी 1 कोटी ५0 लाख निधी मंजूर झालेला आहे. राज्याच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०२३-२४ साठी या कामांना मान्यता मिळाली असून, त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे निधी वितरित करण्यात आला आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व इतर मागास  बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांचे सहकार्य लाभले आहे.

यामध्ये राधानगरी तालुक्यातील एैनी पैकी भैरी धनगरवाडा 10 लाख, शेळेवाडी येथील गोपाळ वस्ती 10 लाख, म्हासुर्ली पैकी मलगुंडे धनगरवाडा 10 लाख, बनाचीवाडी कातकरी वसाहत 10 लाख, कसबा वाळवे बाळ गोपाळ वस्ती 10 लाख, चांदेकरवाडी वड्ड वस्ती 10 लाख, कोनोली तर्फ असंडोली हुंबेवाडी 10 लाख, कोते धनगरवस्ती 10 लाख, कसबा तारळे भोई वस्ती 10 लाख, कंथेवाडी डवरी समाज 10 लाख, कौलव वडर समाज 10 लाख, आवळी बुद्रुक बागडी समाज 10 लाख आदी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा 10 लाख, आवंडी धनगरवाडा 10 लाख, सुळेरान घाटकरवाडी 10 लाख आदी कामे मंजूर करण्यात आला आहे.


तांडा वस्ती योजनेअंतर्गत राधानगरी व आजरा तालुक्यातील विकास कामांना 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – प्रकाश आबिटकर