बातम्या
48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांची 50 नामनिर्देशनपत्र वैध व 5 नामनिर्देशनपत्रे अवैध
By nisha patil - 4/20/2024 8:26:43 PM
Share This News:
कोल्हापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 36 उमेदवारांची एकूण 55 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया 48 - हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी यांचे दालन, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे दि. 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता सुरु करुन दुपारी 12.30 वाजता पुर्ण करण्यात आली.
या छाननीमध्ये श्री. संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी), जगन्नाथ भगवान मोरे (अपक्ष), बाळकृष्ण काशिनाथ म्हेत्रे (अपक्ष) विश्वास आनंदा कांबळे (अपक्ष) व अस्मिता सर्जेराव देशमुख (अपक्ष) अशी एकूण 5 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरविण्यात आली.
एकूण 36 उमेदवारांनी 55 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. छाननी अंती 32 उमेदवारांची 50 नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आली व 5 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आली. सर्व नामनिर्देशपत्रांची छाननी करुन त्यावर निर्णय घेण्यात आला.
छाननी मध्ये वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे व पक्ष तपशील खालीलप्रमाणे आहे. .दादासाहेब/दादगोंडा चवगोंडा पाटील (पक्ष –वंचित बहुजन आघाडी), शिवाजी धोंडीराम संकपाळ (पक्ष - अपक्ष), महंमद मुबारक दरवेशी (पक्ष - अपक्ष), धैर्यशील संभाजीराव माने (पक्ष – शिवसेना, अपक्ष), संतोष केरबा खोत (पक्ष - कामगार किसान पार्टी, अपक्ष), राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (पक्ष - स्वाभिमानी पक्ष), रवींद्र तुकाराम कांबळे (पक्ष - बहुजन समाज पार्टी), सत्यजित बाबासो पाटील (पक्ष - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अपक्ष), शिवाजी विठ्ठल माने (अपक्ष), मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष), रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी, अपक्ष), देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष), बाबासो यशवंतराव पाटील (अपक्ष), डॉ. ईश्वर महादेव यमगर, (पक्ष- भारतीय लोकशक्ती पार्टी), आनंदराव तुकाराम थोरात, (पक्ष- अपक्ष), धनाजी जगन्नाथ गुरव (पक्ष-लोकराज्य जनता पार्टी), इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी), रामचंद्र गोविंदराव साळुंखे (पक्ष –अपक्ष), अरविंद भिवा माने (पक्ष –अपक्ष), राजेंद्र भिमराव माने, (पक्ष –अपक्ष), अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (पक्ष –अपक्ष), लक्ष्मण शिवाजी तांदळे, (पक्ष –अपक्ष), वेंदातिका धैर्यशिल माने, (पक्ष –अपक्ष), परशुराम तम्मान्ना माने, (पक्ष –अपक्ष), शरद बाबुराव पाटील, (पक्ष – नेशनल ब्लॅक पँथर पार्टी), जावेद सिंकदर मुजावर, (पक्ष –अपक्ष), सुनिल विलास अपराध, (पक्ष –अपक्ष), आनंदराव वसंतराव सरनाईक, (पक्ष –अपक्ष), दिनकरराव तुळशीदास चव्हाण, (पक्ष –अपक्ष) व लक्ष्मण श्रीपती डवरी (पक्ष –अपक्ष)
48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 32 उमेदवारांची 50 नामनिर्देशनपत्र वैध व 5 नामनिर्देशनपत्रे अवैध
|