बातम्या
श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत सहा लाख भाविकांची गर्दी, 50 टन भंडाऱ्याची उधळण
By nisha patil - 10/22/2024 11:37:11 AM
Share This News:
पट्टण कोडोली (ता. करवीर) येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेने यंदा भाविकांच्या प्रचंड गर्दीने नवा इतिहास रचला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुमारे सहा लाख भाविकांनी उत्साहात सहभाग घेतला. विठ्ठल बिरदेवाच्या नावाने "चांगभलं" म्हणत, भक्तांनी 50 टन भंडाऱ्याची उधळण केली. यामुळे संपूर्ण परिसर पिवळा सोनेरी दिसू लागला.
यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या फरांडे बाबांच्या ऐतिहासिक भाकणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. मंदिराच्या सभागृहात पारंपारिक हेडाम खेळल्यानंतर त्यांनी भाविकांना विविध क्षेत्रांतील भविष्यकाळाची दृष्टी दिली.
भाकणुकीत बाबांनी सांगितले की:
पर्जन्य: नऊ दिवस कावड फिरणार असून, पाऊस चांगला राहील.
धारण: धारण चढती राहणार आणि महागाई वाढणार.
राजकारण: राजकारणात उलथापालथ होऊन भगव्या झेंड्याचा विजय होणार.
भूमाता: देश समान नागरी कायद्याकडे वाटचाल करणार.
बळीराजा: रोहिणीचा पाऊस आणि मृग नक्षत्रात पेरणी होणार.
महासत्ता: भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
हितसंबंध: बहिण-भावाच्या नात्यातील सलोखा कमी होणार.
रोगराई: देवाच्या सेवेत राहणाऱ्यांचे आजार दूर होतील.
कांबळा: भक्तांचे मी मेंडका होऊन संरक्षण करीन.
यात्रेतील या भाकणुकीनंतर भाविकांनी मोठ्या प्रमाणात खारीक-खोबरे आणि लोकरीची उधळण केली.
श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत सहा लाख भाविकांची गर्दी, 50 टन भंडाऱ्याची उधळण
|