विशेष बातम्या
नरंदे येथे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या फंडातून 63 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ
By nisha patil - 1/6/2023 7:12:59 AM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे)
गेल्या पाच वषा॔त नरंदे गावचे आराध्य दैवत नागनाथ मंदीराला 'ब' वग॔ तीथ॔क्षेत्राचा दजा॔ मिळवून परिसरात दोन कोटींच्या विकासकामांबरोबरच गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे साडेचार कोटींचा भरीव निधी दिला;असे मत जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी व्यक्त केले.नरंदे येथे जिल्हा परिषद सदस्य अरूण इंगवले यांच्या फंडातून व विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या व लोकनेते कै.सिताराम आबाजी भंडारी (बापूजी)पॕनेलच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने मंजूर ६३ लाखाच्या विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी आयोजित काय॔क्रमांत ते बोलत होते.पॅनेल प्रमुख,शरदचे संचालक पै.अभिजीत भंडारी अध्यक्षस्थानी होते.आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,शरदचे संचालक पै.अभिजीत भंडारी,माजी सरपंच रविंद्र अनुसे,अनिल भोसले,शांतिनाथ देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.अरुण इंगवले,अजिंक्य इंगवले,शाखा अभियंता एल.एस.मिसाळ,सुनिता गिड्डे,कविता कुरणे,आळतेचे माजी उपसरपंच फैयाज मुजावर,संतोष कांबळे स्नेहा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी गावातील विविध विकासकामांचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.उपसरपंच रेखा पाटील,संदीप भंडारी,विनोद भंडारी,रूपाली अनुसे,कविता भंडारी,सिकंदर मुल्लाणी,अच॔ना गिड्डे,संगीता खोत,संदीप भंडारी,सुनिल भोसले,पतंगराव पाटील उपस्थीत होते.नितीन कदम यांनी स्वागत केले.राहत मुल्ला यांनी सुत्रसंचलन केले.मयुर देसाई यांनी आभार मानले.
नरंदे येथे जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या फंडातून 63 लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ
|