बातम्या

आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक: पोलिसांत गुन्हा दाखल

7 Crore 66 Lakh fraud of MLA Pratap Sarnaik


By nisha patil - 7/28/2023 5:38:14 PM
Share This News:




आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सरनाईक यांच्याकडून आरोपीनं पैसे घेतले होते. मात्र जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. 2021 पासून आतापर्यंतच्या काळात ही फसवणूक झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काशीमीरा पोलिसांनी  मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता . मात्र आरोपीने फसवणूक केली आहे. सरनाईक यांच्यासोबतच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे हप्तेही आरोपीने भरले नसल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. 
आमदार प्रताप सरनाईक यांनी मार्टीन बर्नार्डो, कोरिया नावाच्या एका व्यक्तीसोबत घोडबंदर रोडवरील जमिनीचा व्यवहार केला. सर्वात आधी सरनाईक यांनी या व्यक्तीला व्यवहारादरम्यान, साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही केला. पण तरीसुद्धा या व्यक्तीनं जमिनीचे पेपर्स सरनाईकांच्या नावावर केले नाहीत. तसेच, सरनाईक यांना पैसेही दिले नाही. 

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार होता होता. मात्र आरोपीने फसवणूक केली आहे. पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून प्रताप सरनाईक सातत्यानं प्रयत्न करत होते. सरनाईक हे 2021पासून जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते. संबंधित व्यक्तीकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर सरनाईक यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या व्यक्तीनं बँकेचे हप्तेच भरले नाहीत म्हणून सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


आमदार प्रताप सरनाईक यांची 7 कोटी 66 लाखांची फसवणूक: पोलिसांत गुन्हा दाखल