बातम्या
कोल्हापूरात ७०.३५ तर हातकणगले ६८.०७ टक्के मतदान
By nisha patil - 8/5/2024 5:43:03 PM
Share This News:
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. ही आकडेवारी अंदाजे असल्यामुळे अंतिम आकडेवारीवेळी यात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूरकरांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरकरांना धन्यवाद दिले.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिये दरम्यान सामाजिक माध्यमांवर आचारसंहिता भंगाची १३ प्रकरणे निदर्शनास आली. यापैकी ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ प्रकरणांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
कोल्हापूरात ७०.३५ तर हातकणगले ६८.०७ टक्के मतदान
|