बातम्या
72 तास जोरदार पावसाचा चा अंदाज
By nisha patil - 3/6/2024 6:26:19 PM
Share This News:
भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला असताना ठिकठिकाणी मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून पूर्व पावसाने डोंबिवलीत हजेरी लावली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर दुपारपासून डोंबिवलीत रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.
72 तास जोरदार पावसाचा चा अंदाज
|