बातम्या

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

74 lakh 48 thousand voters will exercise their right to vote in Mumbai suburban district


By nisha patil - 5/16/2024 12:12:33 PM
Share This News:



 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

            मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार 384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिला, तर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

            यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 68 हजार 983 पुरुष, 8 लाख 42 हजार 546 महिला, तर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 38 हजार 365 पुरूष मतदार तसेच 7 लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 8 लाख 77 हजार 855 पुरूष मतदार तसेच 7 लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला एससी, कलीना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच 8 लाख 2 हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकूण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

            30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणुशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 2 लाख 76 हजार 258 पुरूष मतदार तसेच 2 लाख 44 हजार 036 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकूण 5 लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.


मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क