शैक्षणिक
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
By nisha patil - 1/27/2025 5:08:41 PM
Share This News:
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथपन, अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संविधानाचे सामुदायिक वाचन, तिरंगी फुगे सोडणे, एनसीसी परेड व देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली.
त्याचवेळी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातही ध्वजवंदन झाले. डॉ. संजय डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. हॉटेल सयाजी येथेही ध्वजारोहण करण्यात आले.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
|