बातम्या
आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
By nisha patil - 8/15/2024 6:38:47 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी: विक्रम केंजळेकर पेठ वडगांव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.माजी नौदल सैनिक अशोक कोळेकर, मराठा लाईट इन्फंट्री चे माजी सैनिक नंदकुमार चावरे, सामाजिक कार्यकर्ते दलित मित्र अशोकराव माने,सुशीतो ग्रुप चेअरमन सुधाकर तोडकर, बी ई. सिविल इंजिनियर अँड डेव्हलपर्स आनंद पाटील, आय ई.एस अधिकारी श्रेणिक महाजन,उद्योगपती ऋषिकेश बुकटे, डॉक्टर निर्मल गोडबोले, आय.टी शिवम ढंग, तसेच आदर्श गुरुकुल शिक्षक संस्था संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे,सचिव तथा मुख्याध्यापिका एम.डी घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.शौर्य गाजवण्यापूर्वी जर मला मरण आलं तर त्या मरण्या देखील मी मारून टाकीन असे म्हणणारे माजी सैनिक नंदकुमार चावरे म्हणाले की ३५० जवळपास एन.सी.सी च्या विद्यार्थिनी एक शिस्तबद्ध पासिंग आउट परेड सादर केली. ही कौतुकाची बाब आहे.या संकुलामध्ये राष्ट्र उद्धार करणारे विद्यार्थी घडवले जातात.राष्ट्र राज्यस्तरावर या शाळेला मिळालेली विविध गौरव व सन्मान त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे फलित आहे. आपण सैन्य दलात असताना घडलेला युद्धाचा प्रसंगात आपला पाय गमावला याचं दुःख नाही तर या युद्धात शत्रूशी दोन हात करीत शत्रू मारून टाकले.
याचा सार्थ अभिमान आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही कठीण प्रसन्न न घाबरता शौर्य पराक्रम करण्यासाठी सदैव तयार रहावे.यावेळी बोलताना नौदलचे माजी सैनिक अशोक कोळेकर म्हणाले की एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कवायत परेड,नाटक पोवाडे विविध कला गुण व विविध उपक्रम विद्यालयात राबवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम निर्माण होऊन राष्ट्रहिताच्या दृष्टीने ते भविष्यामध्ये काम करतील. असा विश्वास व्यक्त केला.आय.ई.एस अधिकारी श्रेणिक महाजन यांनी म्हणाले भारतीय स्वातंत्र्याचे मोल हे अनन्यसाधारण आहे शेकडो वर्ष गुलामगिरीत असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी व क्रांतीकारांनी प्राणाची आहुती दिली.त्या क्रांतिकारी प्राण्यांच्या आहुतीचे महत्व ओळखणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्य आणि कष्ट चिकाटी जिद्द सोबत असेल तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता. या संकुलातील संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापिका व गुरुजनांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी या यशाचे शिखर पोचू शकलो. एन.सी.सी अधिकारी कॅप्टन नरेंद्र कुपेकर व कॅप्टन अमर इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली ३५० विद्यार्थ्यांनी पासिंग आऊट परेड सादर केला तसेच विविध विभागातील विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आधारित नाटक सादर केले. क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद याचे नाटक सादर करण्यात आले.तसेच शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला. एन.सी.सी स्काऊट गाईड,तसेच विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे संचलन सादर करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी परिवेक्षक एस.जी.जाधव, प्रशासक एस.ए.पाटील तपासणीस एस.डी खोंद्रे,ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक आर.बी.शिवई ज्युनि.कॉलेज विभाग प्रमुख एस एस चित्ते,डे विभाग प्रमुख एस.एस.गिरीगोसावी,एस.एस चौगुले शिवराज घुगरे, निवासी विभागप्रमुख ए.डी.झरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील,सीमा बाबर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक एस.जी.जाधव यांनी मानले.
आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
|