बातम्या

"इचलकरंजीतील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाची ७९ वी वार्षिक सभा"

79th Annual Meeting of Central Cooperative Handloom Weavers Union at Ichalkaranji


By nisha patil - 8/24/2024 4:25:59 PM
Share This News:



मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ लि. इचलकरंजी या संस्थेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे कार्यालय मेन रोड, इचलकरंजी येथे सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे, व्हा. चेअरमन निवृती गलगले, सन्मती बँकेचे चेअरमन सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, नवमा सूत गिरणीचे चेअरमन चंद्रकांत इंगवले, कामगार नेते शामराव कुलकर्णी, विलास गाताडे, डी. एम. बिरादार, एम.के. कांबळे, दिपक सुर्वे, नंदू पाटील, ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, बाबासाहेब पाटील, विश्वनाथ अग्रवाल यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.


"इचलकरंजीतील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाची ७९ वी वार्षिक सभा"