विशेष बातम्या

8 ग्लास नाही शरीराला एका दिवसात इतक्या पाण्याची गरज

8 glasses is not enough water for the body in a day


By nisha patil - 4/6/2023 8:12:16 AM
Share This News:




नेहमीच आपल्याला सांगितलं जातं की, दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी प्यावं. पण आता वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, दिवसातून 8 ग्लास पाणी पिणं जरा जास्त होतं.

हा नवा स्टडी जर्नल सायन्यमध्ये प्रकाशित झाला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, कसं मनुष्याच्या सेवनासाठी पाण्याची गरज मॅनेज करणं जास्त अवघड होऊ शकतं. कारण पृथ्वीच्या जलवायु आणि मानवी लोकसंख्येत बदल होत असतात.

हा अभ्यास 26 देशातील 5600 पेक्षा जास्त लोकांवर करण्यात आला. वैज्ञानिकांनी या लोकांना पाच टक्के दुप्पट लेबल असलेल्या पाण्याने समृद्ध 10 मिली लिटर पाणी दिलं. हे असं पाणी असतं ज्यात काही हायड्रोजन मॉलिक्यूल्सला स्थिर ड्यूटेरियम नावाच्या आयसोपोट एलिमेंटने रिप्लेस केलं जातं. हे पूर्णपणे सुरक्षित आणि मानवी शरीरात स्वाभाविक रूपात असतं. ज्या वेगाने अतिरिक्त ड्यूटेरियम नष्ट होतं, त्यावरून समजतं की, शरीर किती वेगाने आपलं पाणी बदलत आहे.

20-30 वयाच्या पुरूषांना आणि 22 ते 55 वयाच्या महिलांमध्ये जास्त वॉटर टर्नओवर बघण्यात आला. जो पुरूषांमध्ये 40 वयात आणि महिलांमध्ये 65 वयानंतर कमी होतो. नवीन बालकांमध्ये पाण्याचा टर्नओवर दर सगळ्यात जास्त होता. पुरूष समान परिस्थितीमध्ये महिलांच्या तुलनेत दर दिवशी जवळपास अर्धा लिटर पाणी जास्त पितात.

अभ्यासक सांगतात की, 'सध्याचा अभ्यास संकेत देतो की सगळ्यांसाठी पाणी पिण्याचं प्रमाण एक समान असू शकत नाही आणि जो रोज 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो त्याचा काहीही ठोस पुरावा नाही'. विकसित देशांमध्ये लोक जे क्लायमेट कंट्रोल असलेल्या इनडोअर सेटिंग्समध्ये राहतात, त्यांचा गरिब देशांच्या तुलनेत वॉटर टर्नओवर कमी आहे. कार गरिब देशातील लोक मॅन्युअल लेबर्स म्हणून काम करत आहेत.


8 ग्लास नाही शरीराला एका दिवसात इतक्या पाण्याची गरज