बातम्या

सुगंधित तंबाखूसह 83 हजारांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक

83 000 worth of goods seized including aromatic tobacco Two arrested


By nisha patil - 1/7/2023 11:37:00 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  शहापूर पोलिसांनी सुगंधी तंबाखूसह इलेक्ट्रॉनिक बाईक असा सुमारे ८३ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी वाहतूक करणारा मनोज शंकर व्हदडी (वय 26 राहणार कृष्णा नगर शहापूर) व मधुकर आनंदा मगदूम (वय 26 शहापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

जावईवाडी शहापूर येथील असणाऱ्या मोहन पान शॉप समोरील रोडवर 
मोटारसायकलवरून हे दोघे येत असताना शहापूर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना
संशयावरून पकडले. त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे सुगंधी तंबाखू असा 3 हजार 464 रुपये किंमत असलेला मुद्देमाल सापडला. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे .याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.माळी हे करत आहेत.


सुगंधित तंबाखूसह 83 हजारांचा मुद्देमाल जप्त : दोघांना अटक