शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मधून ८६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
By nisha patil - 8/4/2025 2:54:33 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मधून ८६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
कोल्हापूर दि. 8 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील विज्ञान शाखेतील अंतिम वर्षात शिकत असलेल्या एकूण ८६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल मार्फत 'प्लेसमेंट ड्राईव्ह' चे आयोजन सोमवार, दिनांक ०७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी विविध ०७ नामांकित कंपन्या जसे कि, अँफेनॉल इंडिया, एमकूर फार्मा, एंझीन बायो - सायन्स, निप्रो इंडिया, सँडविक कोरोमंट, गेलटेक, ऎडविक सहभागी झाल्या होत्या. या ०७ कंपन्यांकडून एकूण १२६ विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाची चाचणी व तोंडी मुलाखत घेण्यात आली. त्यातून ८६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष १.८ ते २. ४ लाखांचे पॅकेज देण्यात आले. निवड झालेले हे सर्व विद्यार्थी अल्पावधीतच वेगवेगळ्या पदावर रुजू होतील. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्रबंधक श्री. आर. बी. जोग, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण, डॉ. संजय लठ्ठे, प्रा. संजय थोरात, डॉ. राजश्री पाटील, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, प्रा. विजय पुजारी, डॉ. उपाध्ये, डॉ. कासारकर, प्रा. वृषाली मिसाळ, प्रा. राहुल इंगवले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद कॉलेजच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मधून ८६ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
|