बातम्या
प्लास्टिक वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करत ९० हजार रुपये दंड...
By nisha patil - 9/1/2025 12:34:00 PM
Share This News:
महापालिका आरोग्य विभागाने केली लक्ष्मीपुरीसह विविध परिसरात प्लास्टिकची तपासणी
प्लास्टिक वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करत ९० हजार रुपये दंड...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी लक्ष्मीपुरी, लुगडी ओळ व सासणे ग्राऊंड परिसरात प्लास्टिक वापर तपासणी करण्यात आली. यावेळी लुगडी ओळ येथील ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करत ९० हजार रुपये दंड वसूल केला. तसेच महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी लक्ष्मीपुरी, लुगडी ओळ व सासणे ग्राऊंड परिसरात प्लास्टिक वापर तपासणी करण्यात आलीय. यावेळी लुगडी ओळ येथील ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करत ९० हजार रुपये दंड वसूल केलाय. महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय. लक्ष्मी नारायण स्वीट मार्ट, खत्री पेढेवाले, लक्ष्मीपुरी येथील महालक्ष्मी ट्रेडर्स, श्री प्लास्टिक, दत्त ट्रेडर्स पूजा प्लास्टिक व सासने मैदान येथील अजय ट्रेडर्स या व्यापाऱ्याकडे प्लास्टिकचा साठा आढळून आला. लक्ष्मी नारायण स्वीट मार्ट, खत्री पेढेवाले, महालक्ष्मी ट्रेडर्स व अजर ट्रेडर्स यांना प्रत्येकी ५ हजार रुपये व श्री प्लास्टिक यांना प्रत्येकी १० हजार दंड करण्यात आलाय. सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक गीता लखन, नंदकुमार कांबळे मुकादम व कर्मचारी यांनी कारवाई केलीय.
प्लास्टिक वापर करणाऱ्या ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करत ९० हजार रुपये दंड...
|