बातम्या
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रद्धा इन्स्टिट्यूशनचे 94 विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेस पात्र
By nisha patil - 4/12/2023 8:04:23 PM
Share This News:
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रद्धा इन्स्टिट्यूशनचे 94 विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेस पात्र
मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या व अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, या परीक्षेमध्ये इचलकरंजी येथील JEE व NEET परीक्षेत सर्वोच्च निकाल देणाऱ्या श्रद्धा इन्स्टिट्यूटचे एक-दोन नव्हे 94 विद्यार्थी हे प्रॅक्टिकल परीक्षेस पात्र झाले आहेत.

यामधील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या श्रद्धा फोर इअर प्रोग्रॅमचे 66 विद्यार्थी व श्रद्धा ऑलींपियाड स्कूलचे 28 विद्यार्थी आहेत. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या प्रॅक्टिकल परीक्षेस एकाच इन्स्टिट्यूट मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पात्र होणारी श्रद्धा ही महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक संस्था ठरली आहे. संस्थेचे अचूक नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत, अभ्यासातील विविध क्लुप्त्या, सततचा सराव यामुळेच विद्यार्थ्यांनी एवढे मोठे यश संपादन केलेले आहे
. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री आर तांबे सर यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे समन्वयक श्री. एम. एस. पाटील सर, सौ. सुप्रिया कौंदाडे मॅडम, सौ. संगीता पवार मॅडम, श्री. अक्षय तांबे सर, श्री. अभिषेक तांबे सर, सौ. सृष्टी तांबे मॅडम इत्यादींचे अनमोल मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत श्रद्धा इन्स्टिट्यूशनचे 94 विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेस पात्र
|