बातम्या

मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

9th class girl commits suicide for Maratha reservation


By nisha patil - 11/17/2023 7:41:03 PM
Share This News:



मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील 9 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे. इयत्ता 9 शिकणाऱ्या कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे. 

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. कोमलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं,माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा...मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरु आहे, काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. असे असतानाच मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आत्महत्या सारख्या घटना समोर येत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे समोर येत आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पाच आत्महत्या झाल्या आहेत


मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या