बातम्या
भंडारा जिल्ह्यात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या ,भर रात्री थरकाप उडवणारी घटना
By nisha patil - 4/4/2024 4:36:21 PM
Share This News:
जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार घडला आहे. भर रात्री हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. श्रीकांत हटवार असं मृत तरुणाचं नाव असून अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. लाखनी तालुक्यातील गराडा शेतशिवारात एका तरुणाचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत ढळून आला. या तरुणाचे नाव श्रीकांत हटवार असे असून तो सावरी मुरमाडी इथला रहिवासी आहे. या तरुणाची अज्ञातांनी अगोदर हत्या केली.
त्यानंतर त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र या परिसरातील लोकांमुळे आरोपींचा हा प्रयत्न फसला.आरोपींकडून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला जात असताना लोकांच्या लक्षात आले. नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र समोर पाहिलेला प्रकार लक्षात येताच त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. या लोकांनी लगेच लाखनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भंडारा जिल्ह्यात एका 26 वर्षीय तरुणाची हत्या ,भर रात्री थरकाप उडवणारी घटना
|