बातम्या

मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण, पिडीतेची प्रकृती चिंताजनक

A 64 year old woman was brutally beaten in Mumbai


By nisha patil - 12/20/2023 6:03:11 PM
Share This News:



माणसाला अक्षरशा किळस वाटावी अशी  घटना मुंबईच्या मायानगरीमध्ये घडली आहे. 64 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करुन विवस्त्र अवस्थेत  फेकून दिले. याप्रकरणी  ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीला केली अटक आहे.
   

मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा  हद्दीत 64 वर्षीय महिलेवर ३६ वर्षीय नराधमाने अत्याचार केला.
 या घटनेनंतर नराधमाने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर,प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत. त्यामुळं ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढली. दरम्यान, या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. 
   

  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते. त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने त्या महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो पळून गेला.
   

दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेला  ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली. त्यानंतर या महिलेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी तिथे आले आणि महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पीडित महिलेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध भादंविच्या कलम 376, 376 (2) (एन), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे.अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.


मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण, पिडीतेची प्रकृती चिंताजनक