विशेष बातम्या
चक्क" तरुणांनी मारलेल्या उडीने घेतला 72 वर्षाच्या वृद्धाचा जीव"
By Administrator -
Share This News:
तरुणाने मारलेल्या उडीने घेतला 72 वर्षीय वृद्धाचा जीव, स्विमिंग पूलमध्ये काय घडलं? मुंबईत एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना एका तरुणाने उंचावरून उडी मारली, मात्र स्विमिंग पूलमध्ये तो थेट एका वृद्धाच्या अंगावर जाऊन पडला. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या कुटुंबीयांनी तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे मुंबईतील गोरेगावच्या पश्चिम भागातील ओझोन जलतरण तलावावर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. 72 वर्षीय विष्णू सामंत हे जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते. याचवेळी येथे एक 20 वर्षीय तरुणही आला होता. हाच तरुण अचानक स्विमिंग पुलच्या उंचावरील एका कठड्यावर गेला आणि त्याने थेट स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पण पाण्यात पडण्याऐवजी तो थेट स्विमिंग पूलमध्ये असलेल्या विष्णू सामंत यांच्यावर जाऊन कोसळला. हा आघात एवढा भयंकर होता की, यामध्ये विष्णू हे गंभीर जखमी झाले. त्याच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या.
विष्णू सामंत यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाने जाहीर केलं. या घटनेनंतर विष्णू यांच्या पत्नीने तरुणावर निष्काळजीपणे उडी मारल्याचा आरोप केला आहे.
A 72-year-old man was killed by a youth jump.
|