राजकीय
आ.राजेश क्षीरसागर यांचा या नेत्यावर गंभीर आरोप...
By nisha patil - 2/28/2025 5:32:32 PM
Share This News:
आ.राजेश क्षीरसागर यांचा या नेत्यावर गंभीर आरोप...
क्षीरसागर यांच्या आरोपाने राजकारणात एकच खळबळ
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शक्तीपीठ महामार्ग संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी"विधानसभा निवडणुकीवेळी काही महायुतीच्या नेत्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक रसद पुरवली", असा गौप्यस्फोट करत त्यांनी महायुतीतील काही नेत्यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी गुप्त संबंध असल्याचा आरोप केला.
यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला, त्यामुळे हा राजकीय हल्ला नेमका कोणावर आहे, याची चर्चा रंगली आहे.
आ.राजेश क्षीरसागर यांचा या नेत्यावर गंभीर आरोप...
|