राजकीय

दक्षिणसाठी आ.ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

A Rituraj Patil is the only competent option for South


By nisha patil - 5/11/2024 10:51:32 PM
Share This News:



दक्षिणसाठी आ.ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

कोल्हापूर, ता.5 : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय असून त्यांना निर्णायक मताधिक्य देऊ अशी ग्वाही अर्जुन इंगळे यांनी दिली.

अर्जुन इंगळे म्हणाले, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या कामावर प्रभावित होऊन आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून यापुढे प्रामाणिकपणे काम करु.

आ.सतेज पाटील म्हणाले, प्रत्येकाला सोबत घेऊन आमदार ऋतुराज पाटील हे काम करत आहेत. त्यांना ताकद देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवून दक्षिणला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या.

आ.ऋतुराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचे पाठबळ मला लढायला बळ देत असून मतदार संघातील वाढत्या पाठबळाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे. दक्षिणचा विकास आणखी वेगाने करण्यासाठी आपण सर्वजण एकसंघपणे काम करूया. 

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगांवकर व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक गटाचे कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरीचे ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, राहूल शिंदे, माजी ग्रा.पं. सदस्य महेश शिंदे,  प्रमोद धनवडे, राजू इंगळे, अमित चव्हाण, संतोष धनवडे, कृष्णात माळी, लखन गणेशाचार्य, अक्षय धनवडे, अमोल धनवडे, गोकुळ शिरगावचे संदिप टोपकर, प्रसाद माळी, शहाजी भोसले, ओंकार पाटील, अशिष पाटील, अर्पित पाटील आणि नेर्लीचे स्वप्निल गुरव, अरूण चौगले, सुहास लोखंडे, यशराज मोरे, अनिकेत पाटील, ओमकार गुंडप, समर्थ इंगळे, साहील माने, कृष्णात माळी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

गोकुळ संचालक विश्वास पाटील, डॉ. चेतन नरके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी  मनोगत व्यक्त केले.  गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, सुयोग वाडकर, संभाजी पाटणकर, सदाशिव स्वामी, सरपंच निशिकांत पाटील, उत्तम आंबवडे, सुजाता गुरव, विश्वास शिंदे, कणेरी सरपंच निशांत पाटील, उपसरपंच गुरव, यांच्यासह  कार्यकर्ते उपस्थित होते.
 


दक्षिणसाठी आ.ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे
Total Views: 10