बातम्या
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरून उपमुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
By nisha patil - 8/15/2023 1:28:13 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त नसल्याने कोल्हापूरकरांमध्ये खंत असून येत्या काही दिवसात कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त उपलब्ध नसल्याने महापालिकेमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी केले आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एक महिन्यांपूर्वी कोल्हापूरला सहा दिवसात आयुक्त देण्याची ग्वाही दिली होती मात्र अद्याप कोल्हापूर महानगरपालिकेला आयुक्त मिळालेले नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या भाषणावर दरम्यान लवकरच कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देणार असल्याची ग्वाही दिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांवरून उपमुख्यमंत्र्यांचे मोठं विधान
|