बातम्या

अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलवर मोठी अपडेट

A big update on the sequel of Andaz Apna Apna


By nisha patil - 3/15/2024 6:42:52 PM
Share This News:



  बॉलीवूड अभिनेता आमिर खान ने गुरुवारी, 14 मार्च रोजी आपला 59 वा वाढदिवस साजरा करत 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.

30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या राजकुमार संतोषी यांच्या 'अंदाज अपना अपना'  या चित्रपटाने धमाल केली. सलमान खान आणि आमिर खानची जोडी हिट ठरली होती. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्याही भूमिका होत्या. गेल्या काही वर्षांपासून याच्या सिक्वलबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, त्यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. आता आमिर खानने यावर अपडेट दिली आहे. आमिर खानने लाइव्ह सेशनमध्ये म्हटले की, दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे  अंदाज अपना अपना-2 च्या सिक्वेलवर काम करत आहेत. सध्या हे प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे अतिउत्साहीपणाने यात भाष्य करणे थोडं घाईचे होईल असेही आमिर खानने स्पष्ट केले.


अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलवर मोठी अपडेट