विशेष बातम्या
उघडल्यावर संसार पडलेल्या कोल्हापूरच्या ज्योतीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
By nisha patil - 6/15/2023 8:33:17 PM
Share This News:
भाड्याचे घर महापालिकेने धोकादायक म्हणून पाडल्यानंतर दोन वर्ष पाठपुरावा करूनही प्रशासनाने दाद दिली नाही, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असल्याचे समजल्यानंतर ही महिला आपल्या पाच वर्षाच्या बाळाला घेऊन सभास्थळी पोहोचली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठांसमोर उभे राहून या महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांना आर्त हाक दिली. मी बेघर झाली आहे, माझा संसार उघड्यावर पडला आहे माझ्या घराचा प्रश्न सोडवा अशी साद घातली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या महिलेची समस्या जाणून घेतली, ज्योती जानवेकर असे या धाडसी महिलेचे नाव आहे.
3 जुलै 2021 रोजी कोल्हापूर महापालिकेने आझाद चौकातील एक जुनी इमारत धोकादायक आहे म्हणून पाडली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर जाणवेकर कुटुंब गेली सत्तर वर्ष राहत आहे. सचिन आणि ज्योती जानवेकर यांना तीन मुले असून जानवरकर कुटुंबीय घरात नसताना महापालिकेने घर पाडले असल्याचे ज्योती यांनी सांगितले, गेली दोन वर्ष याच जागेवर राहायला मिळावी यासाठी तीन गुणांसह ज्योती झालेल्या महापालिकेच्या चकरा मारत आहेत.गेली सत्तर वर्ष जानवेकर कुटुंब याठिकाणी राहायला होते, कुळ कायद्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असताना महापालिकेने ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे कारण देत पाडली. घरमालकाचे राजकीय लागेबंधे असल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे असेही जाणवेकर यांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेच्या कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्नही ज्योती जानवेकर यांनी केला होता मात्र अजूनही त्यांचा संसार उघड्यावर आहे मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा प्रश्न सुटेल या आशेने त्या समास्थळी आल्या होत्या. गेली दोन वर्ष तीन मुलांसह नातेवाईक, नवऱ्याच्या मित्रांकडे घर नाही म्हणून राहत आहे. माझं राहतं घर महापालिकेने घर मालकाशी संगणमत करून पाडले मला न्याय मिळालाच पाहिजे अशी साद घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती यांच्याकडून कागदपत्रे घेऊन या केस मध्ये मी स्वतः लक्ष घालतो असं आश्वासन दिले. सभास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना ज्योती यांनी दाखवलेल्या धाडसाची चर्चा शहरभर सुरु होती.
उघडल्यावर संसार पडलेल्या कोल्हापूरच्या ज्योतीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
|