बातम्या
वारणा कारखान्याची तीस टन साखर अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा
By nisha patil - 9/3/2024 11:02:41 PM
Share This News:
पन्हाळा - प्रतिनिधी वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं विक्रीसाठी पाठवलेली तीस टन साखर चोरल्या प्रकरणी ट्रक मालक, ट्रक चालक आणि एक साथीदार अशा तिघांवर अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोडोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या बाबतची फिर्याद शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील ट्रासपोर्ट व्यावसायिक दिग्वीजय मल्लाडे यांनी दिलीय
कोल्हापूर येथील गौतम शुगर ट्रेडींग कंपनीतील ट्रकमध्ये वारणा सहकारी साखर कारखान्यातील अकरा लाख रुपये किंंमतीची ३० टन वजनाची ६०० साखरेची पोती ४ मार्च रोजी भरली होती. ती पोती ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीला द्यायची होती. परंतु ८ मार्च पर्यंत ती पोती ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीत न उतरता स्वतःच्या फायद्याकरीता फिर्यादीची फसवणुक करुन त्याचा अपहार केला. या बाबतची फिर्याद शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील ट्रासपोर्ट व्यावसायिक दिग्वीजय मल्लाडे यांनी दिलीय. याप्रकरणी ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल, ट्रक चालक सिध्दांत गवंड आणि त्यांचा साथीदार मनोहर केदारे , या तिघांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी तपासासाठी पथक रवाना केलं असून पोलीस उप निरीक्षक एन. बी.दांडगे अधिक तपास करतायेत.
वारणा कारखान्याची तीस टन साखर अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा
|