बातम्या

महायुतीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

A case has been filed against Mahayuti candidate and NCP leader Archana Patil


By nisha patil - 2/6/2024 12:38:00 AM
Share This News:



लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना महायुतीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 लोकसभा निवडणुकांच्या  शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाबसह अनेक मतदारसंघात मतदान सुरू आहे. राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळी शांत झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही काळ संपल्याचं दिसून येत आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर हल्लाबोल करणारे नेते आता निवडणूक निकालाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून अद्यापही निवडणूक प्रचारकाळातील घटनांवर कारवाई होताना दिसून येते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना सभा घेतल्यामुळे अर्चना पाटील यांच्यावर प्रचारसभेच्या तब्बल 43 दिवसांनी हा गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


महायुतीच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल