बातम्या

राजारामचे एम डी याना बेदम मारहाण केल्याबाबत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

A case has been registered against 13 people for brutally beating Rajarams MD


By nisha patil - 3/1/2024 2:13:21 PM
Share This News:



राजारामचे एम डी याना बेदम मारहाण केल्याबाबत  १३ जणांविरोधात गुन्हा दाखल 

शाहूपुरी पोलिसानी १३ जण आणि अनोळखी १२ विरोधात केला गुन्हा नोंद 

कोल्हापूर: कारखान्याच्या राजकारणात संघर्षाची ठिणगीत राजाराम कारखान्याचा राजकिय आखाडा तापत असताना  कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कसबा बावड्यात घडली आहे. 
     

प्रकाश जयसिंग चिटणीस हे  कसबा बावडा  येथील राजाराम सहकारी कारखानाच्या एम डी या पदावर कार्यरत आहेत . मंगळवारी दुपारी २५ जणांनी मिळून 7 महिन्यापुर्वी  कसबा बावडा  येथील  राजाराम सहकारी साखर कारखान्यात झालेल्या निवडणुकीत  शाहु परिवर्तन आघाडीचा झालेल्या पराभवास चिटणीस  हेच कारणीभूत आहेत, असा समज करुन तसेच त्या गोष्टीचा राग मनात धरून चिटणीस यांना  ठार मारणाचा कट त्यांनी रचला. त्यानंतर त्यांनी  चिटणीस जेव्हा आपले कारखान्यातील सर्व काम आटपून घरी जात असता, त्यांची गाडी अडविली तसेच चिटणीस याना  गाडीतून खेचून, बाहेर काढून त्याना लाथा बुक्यांनी  जोरदार मारहाण केली.  त्यांचे  2 तोळयाची सोन्याची चेन, रोख रक्कम व इतर वस्तु असा एकूण 1,01,010 चा मुद्देमाल ते घेवुन गेले तसेच चिटणीस यांच्या  गाडीचे दरवाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे 
   

या बाबतची फिर्याद चिटणीस  यानी शाहूपुरी पोलिसात  केली आहे. चिटणीसांच्या फिर्यादीनुसार  पोलीसांनी २५ जनावर गुन्हा नोंद केला. याबाबत अधिक तापास शाहूपुरीचे पोलीस अधीक्षक अजय सिंदकर करीत आहेत


राजारामचे एम डी याना बेदम मारहाण केल्याबाबत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल